साधना विद्यालय हडपसर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

Book HD Image by https://commons.wikimedia.org/ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Reading Inspiration Day celebrated at Sadhana Vidyalaya Hadapsar

साधना विद्यालय हडपसर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

वाचनाने माणूस समृद्ध होतो : प्राचार्य दत्तात्रय जाधव

हडपसर : वाचनाने विचार प्रगल्भ होतात. शब्दांची व अनुभवांची शिदोरी वाढते. वाचन माणसाचे व्यक्तीमत्व घडवते.वाचनामुळे विचारकक्षा रूंदावतात. विद्यार्थ्यांनीही जास्तीत जास्त वाचन करून ज्ञानसमृद्ध व्हावे असे प्रतिपादन साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

माजी राष्ट्रपती स्व. डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस संपूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करतात. साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. विचार प्रवण पिढी घडवण्यासाठी वाचन उपयुक्त ठरते. नव्या पिढीने वाचनाची आवड आवर्जून जोपासणे गरजेचे आहे. या दिवसाचं औचित्य साधून, वाचन चळवळीला प्रोत्साहन मिळावे, वाचनाचा प्रचार, प्रसार व्हावा आणि अधिकाधिक लोकांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने वाचन प्रेरणा दिन साजरा करतात.

कार्यक्रमाच्या सुरवातीला डाॅ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे व ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. माळवाडी परिसरातून ग्रंथदिंडी काढून समाजात वाचनाचे महत्त्व व फायदे याबाबत प्रबोधन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृत्तपत्राचे सामूहिक वाचन केले. यानिमित्ताने विद्यालयातील शिक्षक भरत कोलते,रेखा जाधव यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,माधुरी राऊत,आजीव सेवक अनिल मेमाणे,ग्रंथालय विभागप्रमुख प्रदीप बागल, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे ,पांडूरंग गाडेकर, धनाजी सावंत सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
स्वायत्त विद्यापीठांनी समाज आणि उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन शिक्षण द्यावे
Spread the love

One Comment on “साधना विद्यालय हडपसर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *