C-DOT संशोधन समुदायाच्या संशोधन आणि विकास प्रयत्नांचे कौतुक

Chief of the Air Force Air Chief Marshal V R Chaudhary appreciated the research and development efforts of the C-DOT research community

हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी C-DOT संशोधन समुदायाच्या संशोधन आणि विकास प्रयत्नांचे कौतुक केले

हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (सी-डॉट) संशोधन समुदायाच्या संशोधन आणि विकास प्रयत्नांचे केले कौतुक

अतिशय महत्वपूर्ण अशा पायाभूत सेवांसाठी भविष्यकालीन आणि स्पर्धात्मक युगासाठीच्या सुरक्षित दूरसंचार उपायांच्या विकासासाठी सी-डॉट आणि हवाई दल यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर दिला भर.

सी-डॉट ने हवाई दल प्रमुखांना स्वदेशात विकसित केलेले अत्याधुनिक सुरक्षा उपाय आणि विद्यमान तंत्रज्ञान विषयक कार्यक्रमांची झलक दाखवली.

नवी दिल्ली : हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी 26 मार्च 2024 रोजी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉट) च्या दिल्ली येथील परिसराला भेट दिली. सी-डॉट हे भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाचे प्रमुख दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्र आहे. हे केंद्र सातत्याने संरक्षण क्षेत्रातील संवाद आणि सायबर सुरक्षा यांसारख्या अतिशय महत्वपूर्ण पायाभूत सुविधांप्रमाणे इतर स्वदेशी, सुरक्षित दूरसंवाद उपाययोजना विकसित करण्यावर सक्रियपणे काम करत आहे.

सी डॉट चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजकुमार उपाध्याय यांनी हवाई दल प्रमुखांना वैविध्यपूर्ण दूरसंचार उत्पादनांची माहिती /उपाय, सुरक्षा परिचालन केंद्र (नेटवर्क प्रणालीतील बिघाडाचा प्रत्यक्ष शोध ) यासारखे दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख सुरक्षा उपाय, एंटरप्राइझ सुरक्षा केंद्र (यामध्ये एंटरप्राइझ स्तरावर प्रत्यक्ष शोध करून धमक्या आणि हल्ले कमी करणे या अंतिम टप्प्यापर्यंत समावेश आहे), देवाणघेवाण करण्यासाठी एक सुरक्षित संप्रेषण पद्धत तसेच पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफी किंवा क्वांटम-प्रतिरोधक याविषयी माहिती दिली. याशिवाय स्वदेशी विकसित केलेली 4G कोर आणि 4G RAN, 5G कोर आणि 5G RAN, कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल (CAP) नुसार आपत्ती व्यवस्थापन उपाय, सेल प्रसारण केंद्र, अधिक डेटा स्रोत पाठवता येईल असे ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट आणि ऍक्सेस सोल्यूशन, वैयक्तिक संगणकांनी बनलेले एकल नेटवर्क तयार करण्यासाठीचे स्विचिंग तर संपूर्ण नेटवर्क एकमेकांना जोडणारे रूटिंग सोल्यूशन इत्यादींविषयी देखील सादरीकरण देण्यात आले.

यानंतर उपाययोजनांच्या कार्यात्मक पैलूंवर अधिक भर देऊन त्यांचे प्रत्यक्ष सादरीकरण दाखवण्यात आले.

हवाई दल प्रमुखांनी सी-डॉट च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली केली आणि सध्याच्या आधुनिक युद्धपद्धतींच्या परिदृश्याचे, नेटवर्क केंद्रित पासून डेटा केंद्रित परिवर्तन होण्याच्या काळात अतिशय महत्वपूर्ण अशा पायाभूत सेवांसाठी भविष्यकालीन आणि स्पर्धात्मक युगासाठीच्या सुरक्षित दूरसंचार उपायांच्या विकासासाठी सी-डॉट आणि हवाई दल यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला.

हवाई दलाच्या आवश्यकतेनुरूप त्याप्रमाणे सुरक्षा उपाययोजना विकसित करण्याच्या सी -डॉट च्या वचनबद्धतेची डॉ राजकुमार उपाध्याय यांनी हवाई दल प्रमुखांना ग्वाही दिली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

आता दररोज होणार भगवान श्री रामललाचे दिव्य दर्शन!
Spread the love

One Comment on “C-DOT संशोधन समुदायाच्या संशोधन आणि विकास प्रयत्नांचे कौतुक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *