रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम- पुणे विभागास आदर्श विभाग पुरस्कार 

Rayat Shikshan Sanstha, Satara

West Pune Division of Ryat Shikshan Sanstha received the Adarsh Division Award.

रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम- पुणे विभागास आदर्श विभाग पुरस्कार Rayat Shikshan Sanstha, Satara

हडपसर : रयत शिक्षण संस्थेचा 104 वा वर्धापनदिन सोहळा 4 ऑक्टोबर 2023 रोजी सातारा येथे संपन्न झाला. वर्धापनदिनानिमित्त संस्थेतील विविध शाळा,विद्यार्थी यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार दिले जातात. त्याच पद्धतीने संस्थेच्या प्रशासकीय विभागांनाही शैक्षणिक,भौतिक व गुणवत्तेच्या विशेष कामगिरीबद्दल संस्थेचे माजी चेअरमन प्रा. डॉ. एन डी पाटील यांचे नावे आदर्श विभाग पुरस्कार दिला जातो. यावर्षी संस्थेतून पश्चिम विभाग पुणे कार्यालयाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

सदर पुरस्कार वितरण सोहळा सातारा येथे दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी संपन्न झाला .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र जगदाळे(महासंचालक, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क)यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पश्चिम विभागाचे चेअरमन ,आमदार चेतनदादा तुपे पाटील ,पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार यांनी पुरस्कार स्विकारला.

या प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील , मा. खासदार रामशेठ ठाकूर ,संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी (IAS RETD)व्हा.चेअरमन अॅड भगिरथ शिंदे ,मँनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, डॉ. विठ्ठल शिवणकर ,संघटक डॉ. अनिल पाटील , सचिव विकास देशमुख (IAS RETD, ) सहसचिव बंडू पवार ,सहसचिव डाॅ. ज्ञानदेव म्हस्के , ऑडिटर डाॅ. शिवलिंग मेनकुदळे, व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे विभागाचे चेअरमन, विभागीय अधिकारी, सहाय्यक विभागीय अधिकारी आजी-माजी विभागीय चेअरमन, जनरल बॉडीचे सदस्य, सल्लागार व समन्वय समितीचे सन्माननीय सदस्य, स्थानिक स्कूल कमिटी व व्यवस्थापकीय सल्लागार समितीचे सदस्य, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व लाइफ वर्कर लाईफ मेंबर , तसेच विभागातील सर्व शाखाप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा मिळत आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
आर्थिक सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी ज्येष्ठांना मार्गदर्शन

 

Spread the love

One Comment on “रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम- पुणे विभागास आदर्श विभाग पुरस्कार ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *