शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Taking inspiration from the Shiv Chhatrapati Award-winning athletes, the youth of the state will turn to sports in larger numbers शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येनं खेळांकडे वळतील हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Call for applications for the Shiv Chhatrapati State Sports Award

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहनTaking inspiration from the Shiv Chhatrapati Award-winning athletes, the youth of the state will turn to sports in larger numbers शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येनं खेळांकडे वळतील हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे : राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी २०२२-२३ साठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी २२ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये ज्येष्ठ क्रीडा महर्षींकरीता जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) आणि महिला क्रीडा मार्गदर्शकासाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

या पुरस्कारांसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in/sports_web या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
विकसित भारत संकल्प यात्रेला १ लाख ६७ नागरिकांचा सहभाग
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *