साधना विद्यालयातील 3 विद्यार्थ्यांची ‘स्टेम स्पार्क इनोवेशन फेस्ट 2023’ स्पर्धेच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी निवड

साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

3 students of Sadhana Vidyalaya were selected for a national-level exhibition of the ‘STEM Spark Innovation Fest 2023’ competition

साधना विद्यालयातील 3 विद्यार्थ्यांची ‘स्टेम स्पार्क इनोवेशन फेस्ट 2023’ स्पर्धेच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी निवड

अटल टिंकरिंग लॅब मधील प्रथमेश तगारे ,प्रणव भाटगावे,तेजस गायकवाड या  विद्यार्थ्यांचे यशSadhana Vidyalaya Hadapsar साधना विद्यालय हडपसर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

हडपसर : साधना विद्यालयातील विद्यार्थी अभ्यासाबरोबर खेळ ,कला,सांस्कृतिक कार्यक्रम,विविध स्पर्धेत नेहमीच यश मिळवतात. साधना विद्यालय, हडपसर येथील अटल टिंकरिंग लॅब मधील प्रथमेश तगारे ,प्रणव भाटगावे,तेजस गायकवाड या 3 विद्यार्थ्यांची बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी निवड झाली.

निती आयोग, भारत सरकार पुरस्कृत “स्टेम स्पार्क इनोवेशन फेस्ट 2023” ही राज्यस्तरीय अटल टिंकरिग लॅब (ATL) मधील विद्यार्थ्यांसाठीची स्पर्धा दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी मुंबईच्या अंजुमन ए इस्लाम, फैज तय्यबजी गर्ल्स स्कूल, मुंबई सेंट्रल येथे आयोजित करण्यात आली होती.

राज्यस्तरावरील एकूण 100 प्रोजेक्ट्स मधून साधना विद्यालय, हडपसरच्या अटल टिंकरिंग लॅब मधील खालील 3 विद्यार्थ्यांची बेंगलोर ला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

प्रथमेश तगारे – प्रकल्प स्मार्ट होम सेफ हेवन , प्रणव भाटगावे, तेजस गायकवाड प्रकल्प – फार्मर हेल्पींग रोबोट. या विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणे चे अटल टिंकरिंग लॅब समन्वयक मुराद तांबोळी यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन आमदार चेतनदादा तुपे पाटील ,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे ,अरविंद भाऊ तुपे,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी,सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार , विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, माधुरी राऊत ,आजीव सेवक अनिल मेमाणे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याची क्षमता
Spread the love

One Comment on “साधना विद्यालयातील 3 विद्यार्थ्यांची ‘स्टेम स्पार्क इनोवेशन फेस्ट 2023’ स्पर्धेच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी निवड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *