ससाणे नगर मधील वाहतूककोंडी

Deputy Chief Minister Ajit Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Traffic congestion in Sasane Nagar

ससाणे नगर मधील  वाहतूककोंडी; उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना थेट निवेदन

Deputy Chief Minister Ajit Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News
File Photo

हडपसर : ससाणे नगर मधील नागरिकांनी वाहतूककोंडी, DP रस्ते , रस्ते रूंदीकरण समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना थेट निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या.

सोमवार दिनांक २८ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता अजित दादा हडपसर च्या दौरावर होते. गेल्या अनेक महिन्यांपासून हडपसर ससाणे नगर भागात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होते त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो.

रोज अगदी सकाळ पासून ते रात्रीपर्यंत दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी होत आहे . प्रवासी , नागरिक या रोजच्या त्रासाने अगदी हैराण झाले आहेत . मुजोर रिक्षा व इतर वाहन धारक कोणालाही न जुमानता बेशिस्तपणे विरुद्ध मार्गाने गाड्या घालतात, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते .

नागरिकांनी हडपसर ससाणे नगर, महमदवाडी कृती समितीच्या माध्यमातून अजित दादा पवार यांच्या कडे थेट निवेदन सादर केले आहे. ह्या भगातील dp plan मध्ये मंजूर असलेले २४ मीटर ,१८ मीटर, १२ मीटर, रस्ते अतिक्रमण मुक्त करावेत , रस्ते रुंदीकरण करावे, तसेच अजूनही महमद वाडी ,वाडकर मळा मधील रस्ते गेल्या २३ वर्षा पासून विकसित नाही. ते तातडीने विकसित करावे यासाठी पुढील हप्त्यामध्ये पुणे मनपा आयुक्त व संबधित विभागाची बैठक आयोजित केली आहे.

यावेळी हडपसर ससाणे नगर महमद वाडी कृती समिती च्या वतीने मुकेश वाडकर , शैलेंद्र चव्हाण , संदीप घुले, उल्हास तुपे , अनिकेत राठी, महेंद्र बनकर, दिलीप गायकवाड,संजय मेहता,रोहन ससाणे , मनीषा राऊत उपस्थित होते

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
राज्यात फुटबॉल विकासासाठी जर्मनीतील ‘बुंदेसलिगा’सोबत महत्वाचा सामंजस्य करार
Spread the love

One Comment on “ससाणे नगर मधील वाहतूककोंडी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *