‘वगसम्राट दादू इंदुरीकर’ यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी परिसंवाद

Maharashtra State Drama Competition हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News Maha Sanskruti-cultural-affairs

Seminar to highlight the work of ‘Vagasamrat Dadu Indurikar’

‘वगसम्राट दादू इंदुरीकर’ यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी परिसंवाद

‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्याचे नाशिक येथे सादरीकरण

मुंबई : वग सम्राट दादू इंदुरीकर यांच्या कार्याला उजाळा मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने शनिवार १६ मार्च २०२४ रोजी नाशिक येथे त्यांच्या जीवनावर आधारित “दादू इंदुरीकर यांचे लोकरंगभूमीला योगदान”या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. यावेळी श्री साई फ्रेंड सर्कल आणि दर्शन थिएटर निर्मित “गाढवाचं लग्न”या वगनाट्याचे सादरीकरण होणार आहे.Maharashtra State Drama Competition हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News Maha Sanskruti-cultural-affairs

राज्यामध्ये विविध भागात विविध संस्कृतीचे दर्शन घडते. समृद्ध अशा लोक परंपरेने नटलेले राज्य आहे. वस्त्र संस्कृती, खाद्य संस्कृती, वाद्य संस्कृती व लोकसंस्कृती विविध प्रदेशानुसार बदलत गेलेली दिसून येते. नमन, दशावतार, तमाशा, शाहिरी, कलगीतुरा, जाखडी खेळे इत्यादी लोककला प्रकार अस्तित्वात आहेत. यापैकी तमाशा कलेतील वगनाट्याचा बादशाह म्हणजे दादू इंदुरीकर. महाराष्ट्राला लोककलावंतांची मोठी परंपरा. आजवर अनेक सोंगाडे झाले पण एकच गाजला आणि लोकांच्या गळ्यातला ताईत बनला असा विनोदसम्राट, वगसम्राट म्हणजे दादू इंदुरीकर.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दादू इंदुरीकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार १६ मार्च रोजी सकाळी ११ पासून यू. एस. जी. जिमखाना हॉल, नाशिक रोड, नाशिक येथे सांस्कृतिक कार्यक्रम व परिसंवाद आयोजन करण्यात आलेले असून “दादू इंदुरीकर यांचे लोकरंगभूमीला योगदान” असे या परिसंवादाचे स्वरूप आहे.

या परिसंवादामध्ये प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, प्रभाकर ओव्हाळ, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, सोपान खुडे, ज्ञानेश महाराव, अॅड. रंजना भोसले, खंडुराज गायकवाड सहभागी होणार आहेत.

तसेच यावेळी श्री साई फ्रेंड सर्कल व दर्शन थिएटर निर्मित दादू इंदुरीकर यांचे “गाढवाचं लग्न” या वग नाट्याचे सादरीकरण होणार आहे. नव्या पिढीसाठी असणारे हे वगनाट्य निर्माता / दिगदर्शक – संजय चव्हाण, सुरेश धोत्रे, राजेंद्र इंदुरीकर यांनी बसवले असून त्याची निर्मिती सकंलन – वसंत अवसरीकर यांनी केले आहे. प्रेक्षकांनी शासनाच्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लील आशयावर केली कारवाई

Spread the love

One Comment on “‘वगसम्राट दादू इंदुरीकर’ यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी परिसंवाद”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *