भारतीय रिझर्व बँकेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता सप्ताहाचे आयोजन

Reserve Bank of India logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Financial Literacy Week for students on behalf of Reserve Bank of India

भारतीय रिझर्व बँकेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता सप्ताहाचे आयोजन

सप्ताहाची संकल्पना ‘योग्य सुरुवात करा – वित्तीय स्मार्ट बना’

पुणे : भारतीय रिझर्व बँकेच्यावतीने २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत आर्थिक साक्षरता सप्ताह राबविण्यात येत असतो. त्याचाच भाग म्हणून भारतीय रिझर्व बँक, जिल्हा अग्रणी बँक व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणावळा येथे विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता सप्ताह अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Reserve Bank of India logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Reserve Bank of India

कार्यक्रमास भारतीय रिझर्व बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक सुभान बाशा, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक प्रवीण नलावडे, जिल्हा अग्रणी बँकेचे पी.एस.सरडे, लोणावळा शाखा व्यवस्थापक राकेश कुमार, औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणावळाच्या प्राचार्या प्रतिभा चव्हाण- शिंदे आदी उपस्थित होते.

यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना ‘योग्य सुरुवात करा – वित्तीय स्मार्ट बना’ अशी ठेवण्यात आलेली आहे. या सप्ताहाअंतर्गत विद्यार्थ्यांना बचत आणि चक्रवाढीची शक्ती, विद्यार्थ्यांसाठी बँकिंग सुविधा तसेच डिजिटल व सायबर सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कौशल्य शिक्षणानंतर उद्योग सुरू करण्यासाठी शासकीय योजना अंतर्गत उपलब्ध असलेल्या कर्ज योजनांची माहितीही देण्यात आली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

जिल्ह्यात बुधवारपासून महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *