कोल्हापूर येथे नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार

Minister Hasan Mushrif मंत्री हसन मुश्रीफ हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Nursing College to start in Kolhapur

कोल्हापूर येथे नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करणारMinister Hasan Mushrif मंत्री हसन मुश्रीफ हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई : कोल्हापूर, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहेत. एकूण 7 शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे 173 कोटी 88 लाख इतका खर्च करण्यात येईल. तसेच पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष सुमारे 13 कोटी 99 लाख इतका निधी देण्यात येईल.

कोल्हापूरसह इतर 4 परिचर्या महाविद्यालयांसाठी बांधकाम, फर्निचर, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इ.साठी अंदाजे 107 कोटी 94 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक पदे भरण्यात येतील, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून

Spread the love

One Comment on “कोल्हापूर येथे नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *