भारतीय लष्कराकडून भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

Online registration for Indian Army recruitment भारतीय लष्कराकडून भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

Online registration for Indian Army recruitment has started

भारतीय लष्कराकडून भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

अग्निवीर नियमित केडरच्या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी

महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील आणि दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवार नोंदणी करू शकतात.Online registration for Indian Army recruitment
भारतीय लष्कराकडून भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी 
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने 13 फेब्रुवारी 24 ते 22 मार्च 24 या कालावधीत अग्निवीर आणि नियमित केडरच्या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील आणि दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवार भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात.

संकेतस्थळाच्या JCO/OR/Agniveer नावनोंदणी विभागात हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्हिडिओसह पात्रता, नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे. अर्जदारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी वापरकर्ता अनुकूल चॅटबॉट देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षेदरम्यान खेळाडू, एनसीसी प्रमाणपत्र धारक, आयटीआय आणि पदविका धारकांना अतिरिक्त गुण दिले जातील. ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षेत ऑफिस असिस्टंट/एसकेटी श्रेणीसाठी प्रथमच टंकलेखन चाचणी देखील सुरू करण्यात आली आहे.

उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात दलाल आणि फसवणूक करणाऱ्यांना बळी न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही शंका आणि स्पष्टीकरणासाठी, अर्जदार जवळच्या सैन्य भरती कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.

तरुणांसाठी राष्ट्रीय सुरक्षेसाठी योगदान देण्याची, मौल्यवान कौशल्ये विकसित करण्याची आणि शौर्य आणि अभिमानाचा वारसा असलेल्या प्रतिष्ठित संस्थेचा भाग होण्याची ही सुवर्णसंधी आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय

Spread the love

One Comment on “भारतीय लष्कराकडून भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *